गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार
गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तरुणीला शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २१ जानेवारी २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान घडला आहे. उदयन जैन (वय.३६, रा. वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुणी ही व्यवसायिक जैन याच्या संस्थेमध्ये नोकरी करत होती. त्यावेळी जैन यांनी कामानिमित्ताने कार्यालयात बोलावून ‘तू मला आवडते’ असे म्हणून फिर्यादीला लाज येईल, असे कृत्य केले होते. त्यानंतर तरुणीला आंध्रप्रदेश येथील एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन शरीरसंबंध ठेवले. तसेच उज्जैन, टिंबर मार्केट परिसरातील ऑफिस व गुलटेकडी येथील एका सोसायटीत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार घडल्यानंतर याबाबत कोठे वाच्यता केल्यास अश्‍लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25552 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..