महिला प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला प्रदेशाध्यक्षपदी 
चंद्रकांता सोनकांबळे
महिला प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे

महिला प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

सोनकांबळे यांनी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीसपदावर काम केले आहे. १९९२ मध्ये त्या पुणे महापालिकेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर निवडून आल्या. आतापर्यंत पाच वेळा त्या निवडून आल्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. राज्यातील महिलांवरील अन्याय अत्याचार तसेच महिलांच्या विविध प्रश्नासाठी मोठा लढा उभारून त्यांना न्याय देण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले आहे.


फोटो पिंपरीवरून येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25569 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..