Pune : गुजरातमधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सहातास पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune
गुजरातमधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सहातास पाऊस

गुजरातमधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सहातास पाऊस

पुणे : हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे. त्यात गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी शहरात पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सलग सहा तासांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत पाऊस पडत होता.

विदर्भ मराठवाड्यात पावसाने अंशतः विश्रांती घेतली असली तरी, पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या सत्रात सरासरी ३० मिलिमीटरच्या आसपास पर्जन्याची नोंद झाली. हलक्या स्वरूपाचा पाऊस असला तरी संततधार पडणाऱ्या सरींनी पुणेकरांच्या अडचणीत वाढ केली होती. शनिवारी (ता. १७) दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ही घ्या काळजी...
- तीव्र पावसाच्या कालावधीत दृश्यमानतेत तीव्र घट होण्याची शक्यता
- रस्ते निसरडे, खड्डे पडण्याची शक्यता
- नदीकाठच्या किंवा ओढ्या नाल्यांना लागून असलेल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता.
- रस्त्यालगतची झाडे किंवा फांद्या पडण्याची शक्यता
- रस्ते जलमय झाल्यास वाहतूक कोंडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25657 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..