कोणत्याही रस्त्याने जा, कोंडीत अडकणारच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोणत्याही रस्त्याने जा, कोंडीत अडकणारच!
कोणत्याही रस्त्याने जा, कोंडीत अडकणारच!

कोणत्याही रस्त्याने जा, कोंडीत अडकणारच!

sakal_logo
By

पुणे, ता.१६ ः शुक्रवारी ऐन रहदारीच्यावेळी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने, तसेच इतर कारणांमुळे चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक, प्रवाशांना फटका बसला.
नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिकांचे एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये गेले. कोणत्याही पर्यायी मार्गाचा वापर केला तरीही वाट्याला वाहतूक कोंडीच आल्याचे चित्र शुक्रवारी दिवसभर शहरात पाहायला मिळत होते.

संततधार पावसामुळे मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दररोज सकाळी व सायंकाळी ऐन रहदारीच्यावेळी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी पुन्हा झाली. पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविल्याने शुक्रवारी सकाळपासूनच डेक्कन येथील नदीपात्रामधील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे येथून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये येणारी वाहने कर्वे रस्ता, सिंहगड रस्त्यावर आल्याने अगोदरच वाहतूक कोंडी असलेल्या या रस्त्यांवर आणखीनच ताण वाढला. बहुतांश नागरीकांनी नळस्टॉप, म्हात्रे पूल, डेक्कन या मार्गाने मध्यवर्ती भागात पोचण्याचा प्रयत्न केला, मात्र ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले. शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व पेठांमधील रस्त्यांवरही शुक्रवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.
तर कात्रज कोंढवा रस्ता, बिबवेवाडी, सातारा रस्ता, स्वारगेट, सिंहगड रस्ता, चांदणी चौक, जंगली महाराज रस्ता या रस्त्यांवरही मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर परिसर या ठिकाणीही दिवसभर वाहतूक कोंडी कायम होती. बंडगार्डन रस्ता, नगर रस्ता, कोरेगाव पार्क, सोलापुर रस्ता, हडपसर या ठिकाणीही वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

शहरातील बहुतांश प्रमुख रस्ते व चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडी वाढत गेली. वाहतूक पोलिस, वॉर्डन यांच्याकडून काही ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम सुरु होते. मात्र ठिकठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे, साठलेले पाणी, बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत गेली. मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास प्राधान्य दिले. मात्र त्यानंतरही मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कायम असल्याने बहुतांश नागरिक त्यामध्ये अडकले. सकाळी कार्यालयांमध्ये जाताना, तर सायंकाळी घरी परततानाही वाहतूक कोंडीचा जाच सहन करावा लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

मी कॅम्प परिसरात नोकरीला आहे. आज कामावर जाण्यासाठी एक तास अगोदरच निघालो. मात्र विद्यापीठ चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने खडकी रेल्वे स्थानक मार्गे रेंजहिल्स कॉर्नरला पोचण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे एक तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडीत गेला.- कौस्तुभ साळवे, नोकरदार.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25921 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..