पिस्तूल बाळगणारा तडीपार सराईत अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिस्तूल बाळगणारा 
तडीपार सराईत अटकेत
पिस्तूल बाळगणारा तडीपार सराईत अटकेत

पिस्तूल बाळगणारा तडीपार सराईत अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली. रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलांसह व एक रिकामे मॅगझीन जप्त केले आहे. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरात हा प्रकार उघडकीस आला. याबाबत, पोलिस अंमलदार समीर मझीदुल्ला पटेल यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. २२ फेब्रुवारी २०२१ वर्षी त्याविरोधात शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केली होती. त्याचा भंग करत असताना १५ सप्टेंबर रोजी तो मंगळवार पेठ परिसरात पोलिसांना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याकडे २५ हजार रुपये किमतीचे एक गावठी रिव्हॉलवर, ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्टल व पाच हजार रुपये किमतीचे मॅगझीन असा ७० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील कल्पना झोरे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25924 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..