घरफोडीप्रकरणी एकास कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीप्रकरणी एकास कोठडी
घरफोडीप्रकरणी एकास कोठडी

घरफोडीप्रकरणी एकास कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील तीन सोन्याच्या अंगठ्या व एक वळे चोरल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. युवराज वसंत मोहिते (वय ३४, रा. तोंडोली, ता. कडेगाव, जि. सांगली) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, संगतसिंग अजमीरसिंग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ते पाच जुलै दरम्यान कोथरूड परिसरातील हिल क्रेस्ट सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. याबाबत ६८ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबीयांसह लेह व लडाख येथे सहलीसाठी गेले होते. यादरम्यान, आरोपी त्याच्या साथीदारासह सदनिकेचे कुलूप तोडून घरात घुसला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील तिजोरीत ठेवलेल्या ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या व १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वळे असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील कल्पना झोरे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25928 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..