‘डीएसएसएल-५’मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डीएसएसएल-५’मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ
‘डीएसएसएल-५’मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ

‘डीएसएसएल-५’मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग (डीएसएसएल) सीझन – ५’ या राष्ट्रीय प्रश्नमंजूषा या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमता व गुणवत्ता स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शाळांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि बुद्धिमत्ता विकासाला अधिक चालना मिळत असल्याच्या प्रतिक्रिया या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी व्यक्त केल्या आहेत.
‘बायजुस’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने देशभरातील विविध शाळांच्या सहभागातून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सध्या या स्पर्धा देशभर सुरु आहेत. देशातील विविध राज्यांतील अनेक शाळांमधील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांमधील सामान्य ज्ञान विकसित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. त्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वैयक्तिक गुणवत्ता विकास, त्याचबरोबर त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचा चांगला फायदा होतो. कोरोनाच्या काळात ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असे. परंतु, कोरोनाचे निर्बंध दूर झाल्यानंतर यंदा हीच स्पर्धा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात असल्याने मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या स्पर्धेमध्ये ‘सकाळ’चाही मोलाचा वाटा आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आतापर्यंत तब्बल १२०० पेक्षा अधिक शाळांना यात सहभागी करून घेतले आहे. या सर्व शाळांमधून मिळून तब्बल दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसांची संधी
- इयत्ता चौथी ते दहावीच्या वर्गातील सहभागींना बायजुस वर्गांच्या तीन बूट कॅम्पमध्ये प्रवेश.
- चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चाचणी विश्लेषण आणि डीएसएसएल परीक्षांमध्ये समाविष्ट असलेल्या संकल्पनांवर मास्टर क्लासमध्ये प्रवेश.
- तिसरी ते दहावीच्या वर्गातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बायजुसच्या प्रीमीयम प्रोग्रामवर पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती.
- इयत्ता तिसरी ते दहावीच्या वर्गातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना एक महिनाभर बायजुसच्या कार्यक्रमात मोफत प्रवेश.
- चौथी ते दहावीच्या प्रत्येक वर्गातील ‘टॉप २०’ विद्यार्थ्यांना ‘गणित आणि विज्ञानाच्या प्रगत संकल्पना’ या विषयावरील विशेष कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी.

मेगा बक्षीस : राष्ट्रीय स्तरावरील विजेते आणि प्रत्येक शाळेतील त्यांच्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना इतर आकर्षक बक्षिसांबरोबरच नासाची सशुल्क सहल.


मुख्याध्यापक, प्राचार्य काय म्हणतात....

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही ‘डिस्कव्हरी’ व ‘बायजुस’तर्फे ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करून आमच्या शाळेने विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण केली. गुणवत्ता विकास वाढीसाठी अतिशय उपयुक्त वातावरण निर्मिती केली. चालू शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) सर्व शाळांमधून ऑफलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान वाढीसाठी प्रेरित केले. आमच्या विद्यालयातील इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतचे एकूण ९३५ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. या स्पर्धा परीक्षा नियोजनबद्ध करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले.
- अनिता गुजराथी,
मुख्याध्यापिका, केटीईएस इंग्रजी माध्यम विद्यालय, राजगुरुनगर (ता. खेड)

अप्पर इंदिरानगर येथील ब .रा. अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी प्राथमिक शाळेत ‘बायजुस’तर्फे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. विश्वकर्मा विद्यालयाची
स्वतःची VOLP प्लॅटफॉर्म वेबसाइट असल्यामुळे मुलांना ही परीक्षा देण्यास खूप सोपे गेले. या परीक्षेमध्ये मुलांना सामाजिक, बौद्धिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेले. भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी ही परीक्षा खूप उपयोगी होती. ‘बायजुस’तर्फे या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे.
- श्रद्धा येरोलकर,
मुख्याध्यापक, विश्‍वकर्मा विद्यालय, पुणे

सर्वच विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड जाणारे विषय म्हणजे गणित आणि विज्ञान. या दोन्ही अवघड विषयांना सोपे करण्याचे काम ‘बायजुस’ करीत आहे. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ‘बायजुस ॲप’ कसे हाताळावे, अवघड जाणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष न करता सोप्यात सोपी भाषा वापरून विद्यार्थ्याचे लक्ष कसे केंद्रित करावे व त्या विषयांची सुरवात हसत-खेळत कशी करावी, हे त्यांनी विद्यार्थ्यांची एक सराव परीक्षा घेऊन समजावून सांगितले. या ॲपमुळे सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढणार आहे आणि अवघड व कठीण वाटणाऱ्या विषयांची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून निघून जाऊन ते तणावमुक्त शिक्षण घेण्यास सक्रिय होतील.
- संगीता गिरमे,
प्राचार्य, सीईएस डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26215 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..