बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी अटक
बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी अटक

बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : बेकायदा एक लाख ११ हजार रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. रताराम चमनाजी चौधरी (वय ५२) असे अटक केलेल्याचे नाव आहे. १५ सप्टेंबर २०२२ रोजी पद्मावती परिसरातील तळजाई वसाहत भागात ही घटना घडली. तळजाई वसाहत भागात चौधरी हा एका प्रोव्हिजन स्टोअर्सच्या वरील दुसऱ्या मजल्यावर एक लाख ११ हजार ४९० रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवलेला पोलिसांना मिळाला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी चौधरी याला न्यायालयात हजर केले असता, जप्त केलेला गुटखा त्याने कोणाकडून आणला?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्याने अशा प्रकारे आणखी कुठे साठा केला आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26216 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..