‘देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही’ ः डॉ. रमण गंगाखेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही’ ः डॉ. रमण गंगाखेडकर
‘देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही’ ः डॉ. रमण गंगाखेडकर

‘देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही’ ः डॉ. रमण गंगाखेडकर

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः देशात करोना संसर्गाला सुरुवात झाली त्यावेळी परिस्थिती भयंकर होती. परंतु, करोनाचा उद्रेक झाल्यानंतर ज्या पातळीवरून आपण त्यातून बाहेर पडलो, ती अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढली आहे. मात्र देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी नुकतीच व्यक्त केली

डॉ. अविनाश भोंडवे लिखित आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘पुनरावलोकन कोरोना काळाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गंगाखेडकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लेखक डॉ. भोंडवे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आदी उपस्थित होते.

डॉ. भोंडवे म्हणाले, ‘‘कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय लोक विसरले. कोरोना अखेरच्या घटका मोजत आहे, परंतु तो संपला नाही. कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरविली गेली. भारत देश फारसा शास्त्रोक्त नाही. त्यामुळे शास्त्रावर आधारित गोष्टींवर पटकन विश्वास न ठेवता पारंपारिक समजुतीवर लोक जास्त विश्वास ठेवतात.’’ आरोग्याविषयक जनजागृतीचा बहुसंख्य लोकांवर परिणाम होत नाही. परंतु, काही टक्के लोकांवर नक्की परिणाम होतो. यासाठी आरोग्याविषयी सतत जनजागृती करत राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26250 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..