जलयुक्त शिवारची चौकशी बंद करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलयुक्त शिवारची चौकशी बंद करणार
जलयुक्त शिवारची चौकशी बंद करणार

जलयुक्त शिवारची चौकशी बंद करणार

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व राजकीय दृष्टिकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण जिथं काही चुकीचे झाले आहे, त्या चौकशा सुरू राहतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विविध कार्यक्रमांसाठी फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार असताना जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यावर आता अजित पवार यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावर फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘‘जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गडबड नाही अशा सर्व चौकशा बंद केल्या जाणार आहेत. पण जेथे चुकीचे झाले आहे तेथील चौकशी सुरू राहील.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केल्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘नाना पटोले यांना दिवसातून एक दोन वेळा झटके येतात, त्यामुळे हे काही तरी बोलतात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते.’’ नांदेड येथील कार्यक्रमात मला धक्काबुक्की झालेली नाही, तसेच तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आलेला नाही. विनाकारण अशा प्रकारच्या अफवा पसरवून गैरसमज वाढवले जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. पुणे तळगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलविल्याबद्दल फडणवीस म्हणाले, यासंदर्भात मी काल बोललो आहे. जे विरोधक माहिती नसताना बोलत असतील तर त्यांच्या प्रश्‍नाला मी उत्तर देणार नाही.

कंगना राणावतची आठवण

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रातील वेदांता प्रकल्प गुजरातला पळवला, महाराष्ट्र काय पाकिस्तान झाला का अशी टीका भाजपवर केली आहे. त्यावर फडणवीस यांनी ठाकरे यांना कंगना राणावतची आठवण करून दिली. फडणवीस म्हणाले ‘‘मुळात आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करत आहेत याचे मला आश्‍चर्य वाटते. एकदा अभिनेत्री कंगना राणावतने महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी केली होती. त्यावरून बराच गोंधळ झाला होता.’’

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे सध्या खूप वेळ असून ते आरोप करतच राहणार आहेत. मात्र, मला उत्तर द्यायला वेळ नाही.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26251 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..