जनुकीय चाचण्यांवर बंदी नको ः शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनुकीय चाचण्यांवर बंदी नको ः शरद पवार
जनुकीय चाचण्यांवर बंदी नको ः शरद पवार

जनुकीय चाचण्यांवर बंदी नको ः शरद पवार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १८ : ‘‘जनुकीय परावर्तित तंत्रज्ञानातील संशोधनाच्या माध्यमातून नुकसान होत असल्यास मान्यता देऊ नका. मात्र, या तंत्रातील उपयुक्तता कृषी क्षेत्रात आणायला हवी. सरसकट बंदी न आणता नव्या वाणांच्या विकासासाठी देशात जनुकीय संशोधनात्मक चाचण्या झाल्या पाहिजे,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी मांडले. तर साखर निर्मिती उद्योगात जागतिक पातळीवरील आपले स्थान अबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन’च्या (डीएसटीए) ६७ व्या वार्षिक अधिवेशनाचे व ‘शुगर एक्स्पो २०२२’चे उद्‍घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, राष्ट्रीय साखर संशोधन संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘डीएसटीए’चे श्रीपाद गंगावती, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर व एस. बी. भड तसेच कार्यकारी सचिव गौरी पवार उपस्थित होते.
जैविक ताणास प्रतिकारक व उच्च शर्करा क्षमतेच्या ऊस वाणांचा विकास जनुकीय अभियांत्रिकीतूनच शक्य आहे. मात्र, त्याच्या चाचण्यांसाठी केंद्र सरकारने मान्यता द्यायला हवी, असे पवार म्हणाले. ‘डीएसटीए''च्या वाटचालीचे पवार यांनी कौतुकही केले. साखर उद्योगात देशाची आघाडी असताना संशोधनातील गुंतवणुकीकडे कारखान्यांकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल पवार यांनी खंत व्यक्त केली.

जगातील सर्व देशांना मागे टाकत महाराष्ट्राने सर्वांत मोठा साखर पुरवठादार प्रदेश म्हणून लौकिक मिळवला. यामुळे साखर धंद्याला सोन्याचे दिवस आले आहेत. त्याचे श्रेय कष्टकरी शेतकरी, कृषी संशोधक व साखर कारखान्यांना आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

४७ शोधनिबंध होणार सादर
साखर उद्योगात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना यावेळी शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच, साखर उद्योगातील विविध क्षेत्रात झालेल्या संशोधनविषयक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डीएसटीएचे अध्यक्ष गंगावती केले. या परिषदेत९०० हून अधिक मान्यवर सहभागी झाले आहे. या परिषदेत कृषी, अभियांत्रिकी अशा विविध विषयांशी संबंधित ४७ शोधनिबंध सादर होणार असून त्यावर चर्चा देखील होणार आहे.
.................
फोटो आहे. ९२२५३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26402 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..