पीएच.डी. प्रवेश परीक्षेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएच.डी. प्रवेश परीक्षेची घोषणा
पीएच.डी. प्रवेश परीक्षेची घोषणा

पीएच.डी. प्रवेश परीक्षेची घोषणा

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. सहा नोव्हेंबरला ऑनलाइन पद्धतीने पीएच.डी. प्रवेश परीक्षा अर्थात पेट पार पडणार असून, अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयीन संशोधन केंद्रांमध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले किंवा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. एम.फील, नेट, सेट आणि गेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. ते थेट प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरतात. १०० गुणांच्या परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी आहे.

महत्त्वाच्या तारखा
- पेट परीक्षा ः ६ नोव्हेंबर
- ऑनलाइन अर्जाची मुदत ः ३० सप्टेंबर
- निकालाची संभाव्य तारीख ः १० नोव्हेंबर

आकडे बोलतात
- एकूण विषय ः ६९
- पीएच.डी.च्या रिक्त जागा ः ३१८७

निवड विषयांची रिक्त पदे
- वातावरण आणि अवकाशशास्त्र ः १९३
- वनस्पतिशास्त्र ः १५९
- रसायनशास्त्र ः २०५
- इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन ः २१६
- भूगोल ः १५२
- इंग्रजी ः १२३
- मार्केटिंग व्यवस्थापन ः १००

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः https://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26405 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..