मोठ्या भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठ्या भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू
मोठ्या भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू

मोठ्या भावाच्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः दारू पिऊन आईला त्रास देत असल्यामुळे मोठ्या भावाने लहान भावास जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या लहान भावाचा मृत्यू झाला. दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्यात मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील गोकुळनगर परिसरात घडली.

तेजस यशवंत भोसले (वय २५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता भोसले (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. तर आकाश यशवंत भोसले (वय २९, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आकाश व तेजस भोसले यांच्या आई आहेत. त्यांच्या लहान मुलाकडून त्यांना सातत्याने दारू पिऊन मारहाण होत असे. शुक्रवारी रात्री तेजसने त्याची आई व बहिणीस शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून हा प्रकार त्यांचा मोठा मुलगा आकाशला सांगितला. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राहात असलेल्या इमारतीच्या खाली आकाश व तेजस आले. त्यावेळी आकाशने तेजस यास जाब विचारीत त्याच्याशी भांडणे केली. आकाशने तेजसचा गळा आवळून त्यास ढकलून दिले. त्यावेळी तेजस हा घराच्या सिमेंटच्या कट्ट्यावर पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने तेजसचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26406 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..