Supriya Sule : समस्या मांडायला पालकमंत्रीही नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule
समस्या मांडायला पालकमंत्रीही नाहीत

Supriya Sule : समस्या मांडायला पालकमंत्रीही नाहीत

पुणे : अडीच महिने झाले, ना पालकमंत्री, ना महापालिकेच्या निवडणुका. लोकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी केला.
पाणी, कचऱ्यासह विविध प्रश्‍नांकडे सरकार आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील वेताळबाबा चौकात खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. या प्रसंगी काका चव्हाण तसेच मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महापालिका आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

सुळे म्हणाल्या, ‘‘महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. पुरेसे पाणी मिळत नाही, रस्त्याचा, कचऱ्याचा प्रश्‍न आहे. याला जबाबदार कोण आहे. अडीच महिने झाले सरकार येऊन पालकमंत्री देखील अद्याप मिळालेला नाही. ते असते, तर त्यांच्याकडे दाद मागायला जाता आले असते.’’

चाळीस टक्क्यांची जी सवलत काढून घेतली आहे, महापालिकेचेच हे पाप आहे. त्यामुळे करात प्रचंड वाढ झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. त्यांना भेटून हा प्रश्‍न मी मांडणार आहे. जर त्यांनी हा प्रश्‍न सोडविला नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल.
- सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26447 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..