Pune Railway : पुणे रेल्वे विभाग देशात अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune railway
पुणे रेल्वे विभाग देशात अव्वल

Pune Railway : पुणे रेल्वे विभाग देशात अव्वल

पुणे : पुणे रेल्वे विभागाने एक स्थानक-एक उत्पादन या उपक्रमात बाजी मारली आहे. कमी वेळेत सुमारे नऊ स्थानकांवर ११ स्टॉल उभारले. आपल्या उदिष्ठपेक्षा कमी वेळेत स्टॉलची उभारणी करण्यात आली. इतक्या कमी वेळात देशातील कोणत्याही रेल्वे विभागाने सर्व स्टॉल उभे केले नसल्याचा दावा पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, कलाकारांच्या कलेला वाव मिळावा, या हेतूने रेल्वे मंत्रालयाने देशभरातील निवडक ७५० रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट (एक स्थानक-एक उत्पादन) हा उपक्रम सुरू करीत आहे. १५ ऑक्टोबरपासून या स्टॉलवरून विविध वस्तूंची विक्री होणार आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून हा उपक्रम देशभरातील ७५० स्थानकांवर राबविला जात आहे.

या उत्पादनांना विक्रीस परवानगी
हस्तकला, कापड व हातमाग, पारंपरिक पोशाख व स्थानिक शेतीविषयक पदार्थ आदी प्रकारचे वस्तू वा उत्पादने विक्रीस रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. हे स्टॉल फलाटावर अथवा ज्या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ आहे, अशा ठिकाणी रेल्वेकडून उपलब्ध करून दिले जाईल.

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ ही संकल्पना राबविली जात आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पुणे स्थानकांवर या अंतर्गत विक्रीस सुरवात होणार आहे. पुणे विभागाने खूप कमी वेळेत नऊ स्थानकांवर ११ स्टॉल उभारले आहे. देशांत इतक्या गतीने अन्य विभागात काम झाल्याचे ऐकिवात नाही.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26449 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..