राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वच्छ महोत्सवात सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वच्छ महोत्सवात सहभाग
राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वच्छ महोत्सवात सहभाग

राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वच्छ महोत्सवात सहभाग

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे महापालिका यांच्या वतीने ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरवात शनिवारपासून झाली असून मोहीम २ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. यात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना सहभागी होत येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरामध्ये कात्रज घाट, पर्वती टेकडी आणि ओंकारेश्वर घाट अशा तीन ठिकाणी श्रमदान व जनजागृती करणे, हा मोहिमेचा उद्देश आहे. यात महाविद्यालयातील जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/’ इच्छुकांनी या लिंकवर नावनोंदणी करावी. उपक्रमात सहभागी होताना राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाकडे बॅज असणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26456 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..