Corona Update : गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus
गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ

Corona Update : गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ

पुणे : गणेशोत्सवानंतर पुण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यात सक्रिय रुग्ण वाढले आहेत. राज्यातील २७ टक्के सक्रिय रुग्ण पुण्यात असल्याची माहितीही खात्यातर्फे रविवारी देण्यात आली. पुण्यात ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक निघाली. कोरोना उद्रेकात दोन वर्षे ही मिरवणूक निघाली नव्हती. त्यामुळे या वर्षी अनंत चतुर्दशीला निघालेल्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. रात्रीही लक्ष्मी रस्त्यासह टिळक, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नऊ दिवसांनी पुण्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य खात्यातर्फे दिलेल्या माहितीतून दिसते.

कोरोना रुग्णांची संख्या
राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये मिळून चार हजार ५४० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे एक हजार २२२ (२७ टक्के) रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई (एक हजार ७१) महापालिकेत रुग्ण आढळले आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत पुण्याच्या तुलनेत मुंबईमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र बदलले असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदविले. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एकही हजार २१७ सक्रिय रुग्ण होते. पुण्यात ही संख्या एक हजार १४५ होती.

विसर्जन मिरवणुकीचा परिणाम
दोन वर्षांनंतर होणारी गणेश विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. या गर्दीत मास्कचे प्रमाण अत्यल्प होते. कोरोना हा पूर्णपणे संपलेला नाही. लसीकरण आणि सामुहीक प्रतिकार शक्ती यामुळे तो नियंत्रित झाला आहे. पण, हजारो नागरिकांनी गर्दी केल्याने पुण्यात रुग्णांची संख्या वाढलेली दिसते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविली. या बाबत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. आनंद तांबे म्हणाले, ‘‘गणपती बघण्यासाठी आणि गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यातून संसर्गाचे प्रमाण वाढले.’’

अशी वाढली पुण्यात रुग्णसंख्या
तारीख ....... सक्रिय रुग्णांची संख्या
१६ ............... ११४५
१७ ............... ११६१
१८ ............... १२२२

गणपतीच्या दिवसांमध्ये कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. लक्षणे दिसत असली तरीही गणपतीनंतर दाखवू, ही मानसिकता नागरिकांमध्ये होती. त्यामुळे या काळात रुग्णसंख्या कमी झाली. आता चाचण्या वाढल्या आहेत. त्यातून रुग्णसंख्येचा आकडा काहीसा वाढल्याचे दिसते.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26478 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..