चिकूपिकूतर्फे ‘पालकांची शाळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकूपिकूतर्फे ‘पालकांची शाळा’
चिकूपिकूतर्फे ‘पालकांची शाळा’

चिकूपिकूतर्फे ‘पालकांची शाळा’

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : ‘‘तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले लहान असली तरीही त्यांच्या अंगात तितकीच प्रचंड ऊर्जा असते. त्यांच्याकडे शिकण्याची, आकलन करण्याची क्षमता जास्त असते. अशा वयातील मुलांना वाढवताना पालकांना बरेच प्रश्न पडतात. या वयात मुलांशी छानसा संवाद साधत मुलांना समजून घेणे गरजेचे असते,’’ असा सल्ला लेखक राजीव तांबे यांनी दिला.
चिकूपिकूतर्फे ‘पालकांची शाळा’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘‘एखाद्या गोष्टीला ‘नाही’ न म्हणता मुलांना ती गोष्ट करू द्यावी, चुकांमधून शिकू द्यावे आणि त्यांच्या शिकण्याच्या कृतीला शाबासकी द्यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढू द्यावा. मुलं जर खूप कल्पना करत असतील, तर त्यांच्यातील कल्पकतेला वाव द्यावी. मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीत रमू द्यावे. त्यांना अधिक कल्पक बनण्यास गोष्टींमधून मदत करा,’’ असा सल्ला तांबे यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26481 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..