अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी
अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी

अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना सोमवार (ता. १९) आणि मंगळवारी (ता. २०) अर्ज करता येईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी शुक्रवारी (ता. २३) जाहीर होणार आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रवेशाची ही शेवटची फेरी असणार आहे. यंदा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) ही फेरी होणार नाही, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या अंतिम विशेष फेरीत यापूर्वी प्रतिबंधित झालेले तसेच सर्व उत्तीर्ण व एटीकेटी लागू असलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक संपादित करणे, अर्ज लॉक करून प्रमाणित करणे, नवीन नोंदणी करून अर्ज भाग एक आणि पसंतीक्रम नोंदविणे यासाठी १९ आणि २० सप्टेंबर अशी दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्रवेशित विद्यार्थी (गरज असल्यास) आपला प्रवेश रद्द करून लगेच पसंती अर्ज भाग दोन भरू शकतील आणि या फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. त्यानंतर पसंतीक्रम ठरवून अर्ज लॉक करण्यासाठी बुधवारपर्यंत (ता. २१) मुदत दिली आहे.
या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल. तसेच, प्रवेश प्रक्रियेतील पहिली विशेष फेरी झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचनाही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26513 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..