‘सीपीआर’ प्रशिक्षणासाठी ‘धडकन’ प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीपीआर’ प्रशिक्षणासाठी ‘धडकन’ प्रकल्प
‘सीपीआर’ प्रशिक्षणासाठी ‘धडकन’ प्रकल्प

‘सीपीआर’ प्रशिक्षणासाठी ‘धडकन’ प्रकल्प

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’ आणि ‘रिव्हाईव्ह हार्ट फाउंडेशन’ यांच्यातर्फे ‘कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन’ (सीपीआर) जागरूकता आणि प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारपासून (ता. २४) ‘धडकन’ या नावाने हा प्रकल्प सुरू होईल. या दरम्यान ‘सीपीआर’बाबत प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी दिली.
हृदयविकाराचा धक्का आलेल्या रुग्णाच्या छातीवर योग्य पद्धतीने दाब देऊन हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करता येते. त्यासाठी ‘सीपीआर’ प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. अशा प्रकल्पाचे उद्‌घाटन राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26515 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..