महिलांवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांवरील अत्याचारप्रकरणी
कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे
महिलांवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे

महिलांवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून देशातील बलिया, लखीमपूर येथील घटनाही गंभीर आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व कॉंग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना याबाबतचे निवेदन गोऱ्हे यांनी पाठविले आहे.

महाराष्ट्रातील धडगाव व नंदुरबार या ठिकाणी काही दिवसांपूर्वी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. मागील चार महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. याबरोबरच बलिया, लखीमपूर येथील घटनाही गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे. ‘‘नंदुरबारमधील धडगाव येथील आदिवासी महिलेचे अपहरण, बलात्कार करून तिचा अमानुषपणे खून केला. यासंबंधी पोलिसांनीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच नाशिक परिमंडळाच्या पोलिस महानिरीक्षकांनाही सूचना दिल्या आहेत.’’ असे डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26538 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..