ऑफिस भाडेतत्वावर घेण्याकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑफिस भाडेतत्वावर घेण्याकडे कल
ऑफिस भाडेतत्वावर घेण्याकडे कल

ऑफिस भाडेतत्वावर घेण्याकडे कल

sakal_logo
By

पुणे, ता. २० : कोरोनानंतरही वर्क फॉर्म होमची कार्यपद्धत वाढली असली तरी शहरातील कार्यालयीन जागांची मागणीही वाढली आहे. यंदा पहिल्या सहामाहीत ऑफिसची जागा भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण गेल्या पाच वर्षांचा विचार करता पाच पट वाढले आहे. विशेष म्हणजे ग्रेड ए ऑफिसच्या जागांचा वापर यंदा ५५ लाख चौरस फुटांच्यावर जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५३ टक्के आहे. या जागांना फ्लेक्स, सल्लागार आणि तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीतील मागणीने २०१९ च्या पहिल्या सहामाहीतील मागणीला यापूर्वीच मागे टाकले असून त्यात १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर, रिकाम्या जागांचे प्रमाण तिमाही ते तिमाही आधारावर ५० टक्क्यांनी कमी झाले तर सरासरी भाड्यांमध्ये २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत १.५ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली. व्यावसायिक जागांची मागणी अशाच मजबूत स्थितीत राहण्याची अपेक्षा आहे, असा अंदाज ‘कोलिअर्स’च्या अहवालातील निष्कर्षात नमूद करण्यात आला.

हायब्रीड फ्लेक्स स्पेसला मोठी मागणी
पुण्यातील एकूण भाडेतत्त्वावरील फ्लेक्स स्पेसचा वाटा ३४ टक्के आहे. त्याने तंत्रज्ञान क्षेत्राला मागे टाकले आहे. ज्याचा एकूण भाडेतत्त्वामध्ये १५ टक्के वाटा आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीत अनेक फ्लेक्स स्पेस ऑपरेटर्सनी उत्तम दर्जाच्या ए ग्रेड इमारतींच्या मोजक्या मोठ्या व्यवहारांच्या माध्यमातून आपला विस्तार केला.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- सल्लागार, तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांकडून जागेच्या मागणीत वाढ
- पहिल्या सहामाहीत ऑफिसची जागा भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वार्षिक पाचपटीने वाढले
- आत्तापर्यंत एकूण ३५ लाख चौरस फूट जागेचा करार
- फ्लेक्स ऑपरेटर्सचा सर्वाधिक ३४ टक्के वाटा, शहरात १२ लाख चौ. फूट जागा भाडेतत्त्वावर
- मजबूत मागणीच्या पार्श्वभूमीवर रिकाम्या जागा ५० बेसिस पॉईंटनी घटल्या

पुण्यात कामकाजाच्या व्यवस्थेत कार्यालयांना मुख्य स्थान आहे. येथील पायाभूत सुविधेतील प्रगती, रोजगाराच्या संधी, बांधकाम क्षेत्र देत असलेल्या आकर्षक किमती यामुळे देशातील व्यावसायिक जागांच्या दृष्टीने पुणे आश्वासक बाजारपेठ आहे.
- अनिमेश त्रिपाठी, व्यवस्थापकीय संचालक, कोलिअर्स

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26648 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..