शरद पाटील यांनी दडपलेला इतिहास शोधला ः डॉ. श्रीमंत कोकाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पाटील यांनी दडपलेला इतिहास शोधला ः डॉ. श्रीमंत कोकाटे
शरद पाटील यांनी दडपलेला इतिहास शोधला ः डॉ. श्रीमंत कोकाटे

शरद पाटील यांनी दडपलेला इतिहास शोधला ः डॉ. श्रीमंत कोकाटे

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः ‘‘नामवंत प्राच्यविद्या पंडित शरद पाटील हे संस्कृत पंडित होते. त्यांचे पाणिनी व्याकरणावर प्रभुत्व होते. त्याला मार्क्सवादाची जोड होती. त्यांनी इतिहास, मानवशास्त्र, पुरातत्वविद्या, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी ज्ञानशाखांच्या साह्याने व बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीने प्राचीन व मध्ययुगीन काळातील दडपलेला इतिहास शोधून काढला,’’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी नुकतेच येथे केले. शरद पाटील यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कोकाटे बोलत होते.

मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे प्रमुख भाऊसाहेब जाधव यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि उद्योजक गणेश माने देशमुख म्हणाले, "शरद पाटील मार्क्सवादी होते; परंतु ते पारंपारिक मार्क्सवादी नव्हते. तर त्यांनी मार्क्सवादाला भारतीय तत्त्वज्ञानाची जोड दिली. त्यांनी वैदिक वाङ्मय नाकारले नाही, तर त्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केला.’’ या वेळी कार्यक्रमाला रवी ढमढेरे, गणेश माने देशमुख, लहू लांडगे हे प्रमुख पाहुणे होते. तर राहुल पोकळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्राच्यविद्येचे अभ्यासक राजकुमार घोगरे, प्रा. प्रतिमा परदेशी, इतिहास अभ्यासक प्रा. सुहास नाईक हे प्रमुख वक्ते होते. राजकुमार घोगरे या वेळी म्हणाले, ‘‘स्त्रीवादी इतिहास मांडणारे शरद पाटील महत्त्वपूर्ण प्राच्यविद्यापंडित आहेत. जगात सुरुवातीला शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. सुरुवातीला मातृसत्ता, स्त्रीसत्ता आणि त्यानंतर पुरुषसत्ताक व्यवस्था आली. हा इतिहास प्रथमता शरद पाटील यांनी मांडला.’’ तर "इतिहास हा समाज परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण असतो. शरद पाटील यांनी आयुष्यभर संशोधन करून मौल्यवान असा इतिहासाचा ठेवा निर्माण केलेला आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल पोकळे म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27034 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..