पालकमंत्री नसल्याने समस्या गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री नसल्याने समस्या गंभीर
पालकमंत्री नसल्याने समस्या गंभीर

पालकमंत्री नसल्याने समस्या गंभीर

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः अजित पवार पालकमंत्री असताना दर आठवड्याला शुक्रवारी पुण्यातील कामांचा आढावा घेऊन प्रश्‍नांवर चर्चा होत होती. पण गेल्या तीन महिन्यांपासून पुण्याला पालकमंत्री नाही. समाविष्ट गावांमधील पाणी, कचरा, रस्ते या समस्या गंभीर झाल्या आहेत. पालकमंत्री नसल्याने आता मला आयुक्तांना भेटावे लागले आहे, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पुणे महापालिकेत सुप्रिया सुळे यांनी आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत म्हणाल्या, ‘‘निर्मला सीतारमन या बारामती दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे मी स्वागत करते. गेले १३ वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आहे. माझं आयुष्य सगळं पारदर्शक आहे. सोशल मीडियावर माझ्या कामाचा आढावा घेतला तर समजेल. देशातील लोक मला फॉलो करतात. अर्थमंत्री बारामतीत येत आहेत, तर त्यांनी माझ्या मतदारसंघातील चांगल्या संस्था आहेत त्यांना वेळ असेल तर भेटी द्याव्यात, त्यांची माहिती घ्यावी.’’
राष्ट्रवादी बद्दल गॉसिप करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघे विकासमकामात, पक्ष संघटनेत खूप व्यस्त आहेत. ते दोघे आमच्या कुटुंबाबद्दल, पक्षाबद्दल होणाऱ्या गॉसिपमध्ये वेळ घालवत नाही. म्हणूनच आमच्या पक्षाची कामगिरी वाढली आहे. भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करतात. पण संघर्षाच्या काळात जे कार्यकर्ते भाषण देण्यापासून ते सतरंज्या उचलण्याची कामे करत होती, त्यांना भाजपमध्ये मान सन्मान मिळत नाही याचे वाईट वाटत. पण बाहेरून आलेल्याचा मान सन्मान होतो, असे त्या म्हणाल्या.

मोठा नेता दिलदार असतो
पूर्वी दसरा मेळाव्यात दिलदारपणाने भाषणे व्हायची. आम्हीही ही भाषणे उत्सुकतेने ऐकायचो. पण आता जे काय सुरू आहे ते दुर्दैवी आहे. मोठा नेता हा दिलदार असतो, फक्त पदानी नाहीतर कर्तृत्वाने मोठा होतो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुळे यांनी केली.

नवाब मलिकांकडे दुर्लक्ष नाही
नवाब मलिक यांना कधी डावललं नाही, मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. अजूनही ते आमचे मुख्य प्रवक्ते आहेत. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची २४ तास माझा संपर्क असतो, असेही सुळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27086 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..