निकालाविषयी ‘विद्यापीठा’ची भूमिका स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकालाविषयी ‘विद्यापीठा’ची भूमिका स्पष्ट
निकालाविषयी ‘विद्यापीठा’ची भूमिका स्पष्ट

निकालाविषयी ‘विद्यापीठा’ची भूमिका स्पष्ट

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः उन्हाळी परीक्षांच्या निकालाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर प्रकटन जारी केले आहे. लांबलेले निकाल, पुनर्मूल्यांकन आणि निकालातील त्रुटी संदर्भात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यानंतर विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ऑफलाईन परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्यास उशीर आणि कोलमडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकाबद्दल ‘सकाळ’नेही वेळोवेळी वार्तांकन केले होते. दोन सत्रांमध्ये तब्बल सहा महिन्यांचा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी विद्यापीठाने तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. आजपर्यंत लागलेल्या निकालांमध्ये उत्तीर्णांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे पुनर्परीक्षा घेणे व्यवहार्य नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे, परंतु विद्यार्थ्यांना त्वरित संधी देण्याच्या दृष्टीने आगामी परीक्षा साधारणतः डिसेंबर २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यातच आयोजित केल्या जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतच्या शंका निरसनासाठी प्रचलित पद्धतीनुसार फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज करून त्याचा लाभ घ्यावा. शैक्षणिक हितासाठी परीक्षा विभाग कायम कटिबद्ध आहे. आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येतील.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27526 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..