‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार
‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार

‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : वेब व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी सोपी व प्रमाणित लँग्वेज असल्याने पायथन हा प्रोग्रॅमिंग बिगिनर्ससाठी परफेक्ट ऑप्शन आहे. पायथन सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर सोल्यूशन्ससाठी आयडियल लँग्वेज आहे. मशिन लर्निंग व डेटा सायन्समध्ये वापर होत असल्याने पायथन डेव्हलपर्सना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. याबबत मार्गदर्शन करणारा ऑनलाइन विनामूल्य वेबिनार शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता आयोजिला आहे. यामध्ये ‘रिया ऍडव्हायझरी’चे प्रिन्सिपल कन्सल्टन्ट अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३
क्यूआर कोड : ९२८८३

-----------------------------------------------------------
सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय मार्गदर्शन
पुणे, ता. २१ : कोट्यवधींची उलाढाल असणारे पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी पक्ष्यांचे व्यवस्थापन, मार्केट स्थिती, मार्केटिंग तसेच करार पद्धत, ब्रॉयलर पोल्ट्रीचे अर्थशास्त्र इ.बाबत जाणून घेणे गरजेचे असते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) आयोजिले आहे. यामध्ये पोल्ट्री विषयातील दिग्गज तज्ज्ञ डॉ. माणिक धुमाळ हे मार्गदर्शन करतील. पोल्ट्री उद्योगाची मार्केट डिमांड ओळखून या क्षेत्रात उतरू पाहणारे शेतकरी, युवावर्गासाठी हे प्रशिक्षण फायदेशीर ठरणारे आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

फळे-भाजीपाला डिहायड्रेशन तंत्रज्ञान
हिरव्या पालेभाज्या तसेच कांद्यासारख्या नाशवंत पदार्थांच्या डिहायड्रेशन प्रक्रिया करून केलेल्या भुकटींना तसेच मूल्यवर्धित उत्पादनांना स्थानिक, परदेशी बाजारांतही वाढती मागणी आहे. डिहायड्रेशन तंत्रज्ञान, त्याची ओळख, फायदे, प्रक्रिया कशी करतात याचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) आयोजिली आहे. यामध्ये डिहायड्रेशन कसे करावे, त्यासाठी आवश्यक बाबी, लागणारी यंत्रसामग्री, व्यवसायाच्या संधी, उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक, घरगुती सोलर ड्रायर, सुक्या भाज्यांची आहार मूल्य, गुणवत्ता, इन्स्टंट मिक्स, पॅकेजिंग, साठवण, विक्री व्यवस्थापन इ.बाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रक्रिया उद्योजक, विद्यार्थी, गृहिणींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

शेवगा उत्पादन तंत्र आणि निर्यातीच्या संधी
निर्यातक्षम शेवगा उत्पादन कसे घ्यावे, कोणकोणत्या देशात निर्यातीला संधी आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची कार्यशाळा शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) आयोजिली आहे. कमी पाण्यात व कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवगा पिकाची लागवड कशी करावी, शेवग्याच्या वेगवेगळ्या जातींची ओळख, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणीचे व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम आदी संदर्भात निर्यातदार तज्ञ मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाणः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27539 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..