चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) ‘पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन ः
प्रख्यात कला दिग्दर्शक आणि चित्रकार सुबोध गुरुजी लिखित आणि अनुबंध प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘पाऊलखुणा’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आणि नाना पाटेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, रघुवीर कुल, लेखक योगेश्वर गंधे उपस्थित राहणार आहेत.
कधी ः गुरुवार (ता. २२)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, विधी महाविद्यालय रस्ता

२) ‘पुरुषोत्तम’च्या निकालावर चर्चासत्र ः
यंदाच्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा अनपेक्षित आणि आगळावेगळा निकाल लागला. या निकालावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात स्पर्धेचे आयोजक असलेल्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई, स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या परीक्षक पौर्णिमा मनोहर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे सहभागी होणार आहेत.
कधी ः गुरुवार (ता. २२)
केव्हा ः सायंकाळी ६.३० वाजता
कुठे ः सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ

३) जलतरंगातील चित्रांचे प्रदर्शन ः
प्रसिद्ध जलरंग चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या ‘गुरुकुल’मधील विद्यार्थ्यांच्या जलरंगातील चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध चित्रकार प्रा. डॉ. सुभाष पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार असून रविवारी (ता. २५) सायंकाळी ५.३० वाजता विलास कुलकर्णी यांचे जलरंगातील निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक होणार आहे.
कधी ः शुक्रवार (ता. २३) ते रविवार (ता. २५)
केव्हा ः सकाळी ११ ते सायंकाळी ८
कुठे ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर

४) स्वरमयी गुरुकुलतर्फे कार्यक्रम ः
डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २४) ‘मराठी संगीतकर्मी आणि वंदे मातरम्’ हा कार्यक्रम मिलिंद सबनीस सादर करणार आहेत. तर, रविवारी (ता. २५) ‘किराणा घराणे आणि डॉ. प्रभा अत्रे’ या कार्यक्रमांतर्गत किराणा घराण्याची परंपरागत गायकी, त्यातील बदल, स्थित्यंतरे, डॉ. प्रभा अत्रे यांची गायकी आदींबाबत डॉ. अतिंद्र सरवडीकर दृकश्राव्य व सप्रयोग सादरीकरण करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २४) आणि रविवार (ता. २५)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः स्वरमयी गुरुकुल, संभाजी उद्यानासमोर, जंगली महाराज रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27544 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..