क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

चाकूचा धाक दाखवून रिक्षा पळवली
पुणे, ता. २१ : चाकूचा धाक दाखवून रिक्षा चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (ता. १९) रात्री ७.३० वाजता स्वारगेट जवळ घडला. याप्रकरणी नन्याभाई अजहर अन्सार शेख (वय २७), सुलतान अलबग शेख (वय ३०), रा. दोघेही इंदिरानगर गुलटेकडी यांना अटक केली आहे. नितीन नेटके (वय ३५, रा. गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वारजे भागात घरफोडी
पुणे, ता. २१ : वारजे भागातील रामनगर येथे घरफोडी होऊन चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी (ता.२०) घडली. अज्ञाता विरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मल्लीनाथ लोंढे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी बाथरूममधील बॉक्समधून चावी घेत रूमच्या दरवाजाचे कुलूप उघडून रूममध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा तीन लाख १६ हजार ५०० रुपयांचा माल चोरी केला. दरम्यान उरुळी कांचन येथील पांढरस्थळ वस्तीमध्ये शाहरुख शेख यांची घरफोडी होऊन चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १९ ते २० सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27676 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..