अल्झायमरबाबत जनजागृती वॉकेथॉन रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्झायमरबाबत जनजागृती वॉकेथॉन रॅली
अल्झायमरबाबत जनजागृती वॉकेथॉन रॅली

अल्झायमरबाबत जनजागृती वॉकेथॉन रॅली

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : जागतिक अल्झायमर दिनानिमित्ताने मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरामध्ये अल्झायमर आजाराबाबत बुधवारी (ता. २१) जनजागृती वॉकेथॉन रॅली काढली.
मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जागृती पुनर्वसन केंद्र, कर्वे समाज सेवा संस्था, चैतन्य पुनर्वसन केंद्र, मनसमर्थ लायन्स क्लब आणि भारती विद्यापीठ अशा विविध संस्थांनी बुधवारी जनजागृती वॉकेथोन रॅलीचे आयोजन केले. कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या समाजकार्य द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी अल्झायमर आजाराची माहिती व जनजागृती करणाऱ्या विविध पोस्टर्सचे प्रदर्शन करून बालगंधर्व रंगमंदिर व संभाजी उद्यान परिरासामध्ये जनजागृती केली.
जागृती पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अमर शिंदे, कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड ‘डीसएबीलीटीज’चे अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण, कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विनायक कराळे, एम. शिवकुमार, प्रसाद कोल्हटकर, डॉ. शर्मिला रामटेके, प्रा. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन केले. प्रा. चेतन दिवाण, डॉ. विद्याधर वाटवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आवटे, डॉ. धर्मेंद्र केंद्रे, डॉ. प्रीती शिंदे, डॉ. मधुमिता बहाले, डॉ. अंजली देशपांडे, प्रसाद कोल्हटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27697 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..