पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका
पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका

पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः कॅबचालकावर चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत असतानाच पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दांडका मारून एका पोलिस अधिकाऱ्याला ढकलून दिल्याचा प्रकार बाणेर रस्त्यावर मंगळवारी घडला. अभिनव शैलेंद्रकुमार सिंग (२७, रा. फेज ३, हिंजवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार संदीप बर्गे यांनी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाणेर येथील डी-मार्टच्या पार्किंगमध्ये कॅब चालक गाडी उभी करून थांबला होता. त्यावेळी सिंग याने पुणे रेल्वे स्टेशन येथे जाण्याबाबत विचारले असता, कॅब चालकाने नकार दिला. त्या रागातून सिंग याने चालकाच्या पोटावर चाकूने वार केले. त्याबाबत चतुश्रृंगी पोलिसांना माहिती मिळताच रात्रपाळीवर असलेले पोलिस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. सिंग याला ताब्यात घेत असताना, त्याने अंमलदार बर्गे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. तर, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला ढकलून देत खाली पाडले. यात अंमलदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27704 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..