आशिष चांदोरकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशिष चांदोरकर यांचे निधन
आशिष चांदोरकर यांचे निधन

आशिष चांदोरकर यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : पत्रकार आशिष चांदोरकर (वय ४४) यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक बहिण आहे.
‘सांजसमाचार’ पासून चांदोरकर यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ‘केसरी’, ‘सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वर्तमानपत्रांबरोबरच ई टीव्ही आणि साम या वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीवरचे लेखन ही त्यांची ओळख होती. राज्य शासनाचा २०१५ मध्ये देण्यात आलेला पहिला सोशल मीडिया पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र’ हे पुस्तक त्यांनी केले होते. शोकाकूल वातावरणात चांदोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27707 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..