स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोला प्रतिसाद
स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोला प्रतिसाद

स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोला प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याचा पर्याय गेल्या काही वर्षांपासून निवडत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरपासून २२ जुलैपर्यंत सीमा पुन्हा उघडल्यापासून २ लाख ६० हजारहून अधिक विद्यार्थी ऑस्ट्रेलियात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियन सरकारच्या ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनचे (ऑस्ट्रेड) इंडिया डिजिटल एज्युकेशन हबचे संचालक विक सिंग यांनी नुकतीच दिली.
ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनद्वारे स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोचे नुकतेच शहरात आयोजन केले होते. याप्रसंगी भारतीय विद्यार्थ्यांच्या जागतिक पातळीवरील करिअरला आकार देण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या उपक्रमांवर या कार्यक्रमात प्रकाश टाकला. या वेळी ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या २६ प्रतिनिधींशी विद्यार्थी, पालकांनी संवाद साधला. कोची, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि जयपूर मध्येही ऑस्ट्रेलियन रोड शो चे कार्यक्रम नुकतेच झाल्याचे सिंग यांनी सांगितले. तसेच यावेळी स्टुडंट व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया आणि ऑस्ट्रेलियन व्हिसा, शिष्यवृत्ती, वसतीगृह, सुरक्षितता या बाबतची माहिती ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रतिनिधींनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27780 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..