पुणे विमानतळ ते विमाननगर रस्त्याला ‘संरक्षण’ची परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विमानतळ ते विमाननगर रस्त्याला ‘संरक्षण’ची परवानगी
पुणे विमानतळ ते विमाननगर रस्त्याला ‘संरक्षण’ची परवानगी

पुणे विमानतळ ते विमाननगर रस्त्याला ‘संरक्षण’ची परवानगी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : पुणे विमानतळावरील २३५० चौरस मीटरच्या संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्यास संरक्षण विभागाने परवानगी दिल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.
पुणे विमानतळापासून विमाननगरला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यावर असलेल्या संरक्षण विभागाच्या सुमारे अर्ध्या एकर जागेवर पुणे महापालिकेला काम करण्यास परवानगी मिळत नसल्याने हा रस्ता गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना विमाननगरला व विमानतळावर जाण्यासाठी इतर पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत होता. तसेच या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यायाने नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब व मानसिक त्रास होत होता. तसेच नवीन विस्तारित विमानतळासाठी देखील हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते.
ही जागा पुणे महापालिकेला रस्ता तयार करण्यासाठी नाममात्र दरात उपलब्ध करून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे.

नाममात्र शुल्कावर परवानगी
संरक्षण मंत्रालयाने विशेष बाब म्हणून संरक्षण खात्याच्या जमिनीवर विमाननगरला पर्यायी प्रस्तावित २० मीटर रुंद असलेला रस्ता जोडणीसाठी महापालिकेला परवानगी दिली आहे. यासाठी नाममात्र एक रूपया वार्षिक परवाना शुल्कावर परवानगी दिली आहे. यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार आहे. हवाई दलाच्या जमिनीच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचा भाग पुणे महानगरपालिकेने यापूर्वीच पूर्ण केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27803 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..