घरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड
घरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड

घरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : साथीदाराच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याचा साथीदार मात्र निसटला. आरोपीकडून १० लाख पाच हजार रुपये किमतीचा १८० ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. युवराज मोहिते (वय ३४, रा. सांगली) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे समांतर तपास करीत होत्या. तेव्हा संशयित आरोपी कोथरूड येथील डुक्करखिंड येथे येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपी दुचाकीवरून डुक्कर खिंडीकडून महात्मा सोसायटीच्या दिशेने जाताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिस आल्याचे पाहताच दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने गाडीवरून उडी मारून टेकडीच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र, तो टेकडीवरील झाडीत पळून गेला. तर त्याचा साथीदार मोहिते याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात कोथरूड येथील तीन, सिंहगड रोड पोलिस ठाणे, अलंकार पोलिस ठाणे, दत्तवाडी आणि खेड पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर पंढरपूर पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीचाही एक गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, राकेश टेकवडे, रामदास गोणते, दीपक क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेला सराईत चोरट्यावर चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे आणि खुनाचा गुन्हाही दाखल आहे. त्याच्याकडून १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार हा पुण्यातील असून त्याचाही शोध सुरू आहे.
- अनिता मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट तीन, गुन्हे शाखा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27989 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..