‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ पॉव्हर्टी’ विषयी व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ पॉव्हर्टी’ विषयी व्याख्यान
‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ पॉव्हर्टी’ विषयी व्याख्यान

‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ पॉव्हर्टी’ विषयी व्याख्यान

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य आणि अर्थतज्ज्ञ लॉर्ड मेघनाथ देसाई यांचे व्याख्यान येत्या शनिवारी (ता. २४) पुणेकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा २८ वा दीक्षांत समारंभ शनिवारी (ता. २४) होणार आहे. त्यावेळी देसाई प्रमुख पाहुणे असतील. तर कुलपती राजीव कुमार कार्यक्रमात अध्यक्ष असतील. देसाई सध्या ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे मानक प्राध्यापक आहेत. राजीव कुमार हे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती असून त्यांनी नीती आयोगाचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. दीक्षांत समारंभासोबत रावबहादूर काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान होणार असून त्यात देसाई ‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ पॉव्हर्टी’ या विषयावर भाष्य करतील. समारंभात ४६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच असून तो गोखले संस्थेच्या युट्युब तसेच फेसबुक पेजवरून लाइव्ह प्रसारित होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28013 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..