इंडिया हॅकेथॉनमध्ये ‘एओई’च्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडिया हॅकेथॉनमध्ये 
‘एओई’च्या विद्यार्थ्यांचे यश
इंडिया हॅकेथॉनमध्ये ‘एओई’च्या विद्यार्थ्यांचे यश

इंडिया हॅकेथॉनमध्ये ‘एओई’च्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

पुणे ः स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत सॉफ्टवेअर एडिशनमध्ये एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदीच्या चार संघांना विविध प्रकारात विजेतेपद मिळाले आहे. टीम युक्तीच्या संघाने कंप्लेंट रिड्रेसल मशिनरी (तक्रार निवारण यंत्रणा) या विषयावर वेब अ‍ॅप्लिकेशन तयार केले. टीम सिनर्जीने विद्युत वाहनांची शहरामध्ये चार्जिंग सुविधा शोधण्यास मदत करण्यासाठी संकेतस्थळ तयार केले. टीम अ‍ॅस्ट्राने दिलेल्या कार्यात विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी एकाग्रता वाढविण्याकरिता क्रोम एक्सटेंशन हा उपाय तयार केला. तर स्पॅम बाईटसने ई-मेल स्पुफिंग डिटेक्शनसाठी एसएमटीपी सर्व्हरच्या माध्यमातून विविध सुरक्षा निकषांसह उपाय सुचविला. टीम युक्तीमध्ये प्रद्युम्न गायके, आदित्य बिरांगल, निरंजन गिऱ्हे, आदित्य बर्वे, मयूर घोडेकर, श्रुती धुमणे तर टीम सिनर्जीमध्ये आदर्श झंवर, अभिषेक मोरे, अनुज बर्वे, ईवा खजुरिया, अनिकेत कुमार व टीम अ‍ॅस्ट्रामध्ये सात्त्विक देवळे, मितेश टंक, प्रतीक लागस्कर, सोहम पराते, जिज्ञासा झोपे, भाग्यश्री कदम आणि टीम स्पॅम बाईटसमध्ये अनुष्का यादव, आदित्य कुमार, अमेय वाईकर, अथर्व खोंडे, ऋषिकेश चपके आणि अनुराग तपारिया यांचा समावेश होता.

अश्विनी मल्होत्रा यांनी जीवनगौरव पुरस्कार
पुणे ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट (आयआयएमएम) पुणे शाखेतर्फे आठवा वार्षिक सप्लाय चेन मॅनेजमेंट पुरस्कार सोहळा नुकताच झाला. दरवर्षी सप्लाय चेन मॅनेजेमेंटमधील सर्वोत्तम कामगिरीकरिता हे पुरस्कार प्रदान केले जातात. याप्रसंगी पुरस्कार सोहळ्यात वेकफिल्ड फुडसचे व्यवस्थापकीय संचालक आश्‍विनी मल्होत्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेंटचे (आयआयएमएम) राष्ट्रीय अध्यक्ष हरिश कुमार शर्मा, पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष के. आर. नायर, आयआयएमएम पुणेचे अध्यक्ष श्रीपाद कदम, उपाध्यक्ष श्रीवर्धन गाडगीळ, मानद सचिव अर्जुनसिंग राजपूत, कार्यक्रमाचे समन्वयक अमित बोरकर आणि आयआयएमएम पुणेचे माजी अध्यक्ष टेरेन्स फर्नांडिस आदी मान्यवरांसह पुण्यातील कार्यकारिणी सदस्य आणि पुणे शाखा सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात आयआयएमएमच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डेक्कन कॉलेजमध्ये आज ‘ओपन डे’
पुणे ः डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे येत्या शनिवारी (ता. २४) ‘ओपन डे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागामध्ये सुरु असलेला संस्कृत विश्वकोश हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प एका दिवसासाठी सगळ्यांकरिता खुला ठेवण्यात येणार आहे. जगामधील सर्वांत मोठ्या अशा संस्कृत शब्दांच्या विश्वकोशाचे कामकाज कसे चालते, त्याच्या निर्मितीमधील वेगवेगळे टप्पे तसेच आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड याविषयी माहिती याप्रसंगी देण्यात येणार आहे. डॉ. सुमित्र कत्रे या प्रसिद्ध भाषातज्ज्ञांच्या दृष्टीतून साकारण्यात येणारा हा कोश पुण्यामध्ये तयार होत आहे. ऋग्वेदापासून ते १९ व्या शतकातील ग्रंथांपर्यंत जवळजवळ १५०० संस्कृत ग्रंथांमधून एक कोटी संदर्भांचे संकलन करून तयार केलेले स्क्रिप्टोरिअम पाहण्याची संधी या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.

राउंड टेबल इंडियाद्वारे अपंगांना अवयवदान
पुणे ः राउंड टेबल इंडियाने दिव्यांग उपक्रमाच्या अंतर्गत, विशेषाधिकारप्राप्त पार्श्वभूमीतील अपंग व्यक्तींसाठी उच्च अवयवदान मोहीम नुकतीच आयोजित केली होती. तळेगाव दाभाडे येथे इनाली फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर झाले. त्यात आठ व्यक्तींना मोटाराइज्ड अप्पर लिंब (कृत्रिम अवयव) मिळाले. हे अवयव विशेषतः इनाली फाउंडेशनने डिझाइन केलेले आणि बनवलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध उत्पादनांच्या बरोबरीने आहेत. अशा उपक्रमांव्यतिरिक्त, राउंड टेबल इंडिया शिक्षणासाठीही सक्रिय आहे. ‘शिक्षणाद्वारे स्वातंत्र्य’ या उपक्रमांतर्गत राउंड टेबलने देशात आठ हजारांपेक्षा जास्त वर्गखोल्या तयार केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28103 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..