‘खायचे’ वेगळे, ‘दाखवायचे’ वेगळे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘खायचे’ वेगळे, ‘दाखवायचे’ वेगळे!
‘खायचे’ वेगळे, ‘दाखवायचे’ वेगळे!

‘खायचे’ वेगळे, ‘दाखवायचे’ वेगळे!

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : इमारतीच्या गच्चीवर रुफ टॉप ऑफ हॉटेल सुरू करताना किंवा साइड मार्जिनमध्ये जाण्यायेण्याचा रस्ता बंद करून ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार न थेट हॉटेल सुरू केले जात आहेत. मिळकत कर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत अशा बेकायदा हॉटेलची संख्या ३५०च्या पुढे गेलेली असताना बांधकाम विभागाच्या रेकॉर्डवर मात्र फक्त ७१ बेकायदा रुफ टॉप हॉटेल आहेत. तर साइड मार्जिनमधील हॉटेलची माहिती उपलब्धच नाही. त्यामुळे ज्या जागेचा व्यावसायिक वापर होऊ शकत नाही अशा ठिकाणी धोकादायकपणे हॉटेल सुरू केले जात असताना बांधकाम विभागाकडूनच याकडे दुर्लक्ष होत आहे.
पुण्यामध्ये हॉटेल व्यवसायाला जोरदार प्रतिसाद असतो. त्यामध्ये त्यामध्ये इमारतीच्या गच्चीवर सुरू केली जाणाऱ्या रुफ टॉप हॉटेलला ग्राहकांची पसंती मिळत असल्याने रुफ टॉप हॉटेलची संख्या ही वाढत आहे. मात्र हे हॉटेल सुरू करताना ग्राहकांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. अग्निशामक यंत्रणा नसणे, बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असणे, लिफ्टची सुविधा असली तरी ती आणीबाणीच्या प्रसंगात उपयोगात येईल अशी स्थिती नाही. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे अवघड होऊ शकते. बाणेर येथे जून महिन्यात एका हॉटेलला आग लागली त्यावेळी अशीच भयानक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशानुसार रुफ टॉप ऑफ हॉटेलसह साइड मार्जिन, फ्रंट मार्जिनधील जागेत हॉटेल सुरू करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. इमारतीच्या गच्चीचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने बेकायदा बांधकाम केल्याने तीन पट मिळकतकर लावून दंड वसूल करावा असेही आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मिळकतकर विभागाने कार्यवाही सुरू केलेली आहे.

हॉटेलमालकांची न्यायालयात धाव
मिळकतकर विभागाने गुरुवार पर्यंत २८० हॉटेलची माहिती संकलित केली होती. शुक्रवारी यात आणखी भर पडून आता ही संख्या ३५०च्या पुढे गेलेली आहे. पण बांधकाम विभागाकडे साइड मार्जिनधील हॉटेलची माहिती उपलब्ध नाही. तर रुफ टॉप हॉटेलची संख्या ७७ आहे. त्यापैकी ६ हॉटेल अधिकृत आहेत. ७१ बेकायदा हॉटेल पैकी ६८ जणांना नोटीस बजावली आहे. त्यापैकी १९ ठिकाणी कारवाई झाली आहे. त्यातील काही व्यावसायिकांनी महापालिकेला न जुमानता पुन्हा पुन्हा हॉटेल सुरू झाले आहेत. त्यामुळे आता या सर्व हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर नऊ हॉटेलमालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मिळकतकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रुफ टॉप आणि साइड मार्जिनमधील हॉटेलची संख्या ३५०च्या पुढे गेली आहे. त्या सर्वांना तीनपट मिळकतकर लावला जाणार आहे. बांधकाम विभागाकडे ज्या हॉटेलची माहिती आहे. त्याचीसुद्धा पडताळणी करून कारवाई केली जाईल.
- अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर विभाग

बांधकाम विभागाने बेकायदा रुफ टॉप हॉटेलवर कारवाई सुरू केली आहे. ७१ अनधिकृतपैकी ६८ जणांना नोटिसा दिल्या आहेत. १९ जणांवर कारवाईही केली आहे. पण आणखी काही हॉटेल असतील तर ते शोधून काढले जातील, त्यांच्यावर कारवाई करू. तसेच मिळकतकर विभागाची माहिती घेऊन रुफ टॉप व साइड मार्जिनमधील हॉटेलवर कारवाई करू.’’
- युवराज देशमुख, अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28171 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..