पुण्यात रंगणार पहिला पर्यटन लघुपट महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात रंगणार
पहिला पर्यटन 
लघुपट महोत्सव
पुण्यात रंगणार पहिला पर्यटन लघुपट महोत्सव

पुण्यात रंगणार पहिला पर्यटन लघुपट महोत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे येत्या मंगळवारी (ता. २७) सकाळी १० ते २ या वेळेत विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात पहिला राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव रंगणार आहे. यावेळी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. चप्पलवार म्हणाले, ‘‘महोत्सवात सहभाग घेतलेल्या सुमारे ७० स्पर्धकांमधून २५ स्पर्धकांच्या लघुपटाची स्क्रीनिंगकरीता निवड झाली आहे. महोत्सवात स्क्रीनिंगसह ‘पर्यटन व माध्यमांची भूमिका’ यावर परिसंवाद होणार आहे. यात ‘एफटीआय’चे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले व जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी सहभागी होणार आहेत. तर, बक्षीस वितरणासाठी पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष शेखर कपूर उपस्थित राहणार आहेत.’’ याप्रसंगी पर्यटन विभागाच्या पल्लवी कुमावत, संयोजन समितीतील अजित शांताराम, सल्लागार पंकज इंगोले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28272 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..