ट्रिनिटी कॉलेजचे १० पेटंट प्रकाशित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रिनिटी कॉलेजचे
१० पेटंट प्रकाशित
ट्रिनिटी कॉलेजचे १० पेटंट प्रकाशित

ट्रिनिटी कॉलेजचे १० पेटंट प्रकाशित

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : केजे एज्युकेशनल ट्रस्ट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (टीसीओईआर) येथील विद्यार्थी व शिक्षकांचे १० पेटंट प्रकाशित झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकाराने डेव्हलपमेंट विभागामार्फत विद्यार्थी व शिक्षकांच्या संशोधनाला वाव देत एकूण १० प्रोजेक्ट पेटेंटची प्रक्रिया यशस्वीरीत्या करून प्रकाशित करण्यात आली.
डॉ. अभिजित औटी यांच्या नेतृत्वात वायरलेस फायरिंग वेपन फॉर मिलिटरी पर्पज, प्रा. जयश्री सत्रे यांच्या नेतृत्वात रिऍक्टिव्ह पॉवर असेसमेन्ट विथ अँड विदाऊट इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग, प्रा. प्रतिभा चव्हाण (मल्टीमॉडेल अप्रोच फॉर अर्ली डिटेक्शन ऑफ कोविड-१९ युजींग सीएनएन), डॉ. सुजित मोरे (एआय डेक्सटॉप असिस्टंट) व (इमोशन रेकग्नीशन युसींग मशिन लर्निंग), प्रा. गजानन अरसलवाद (ब्लॉकचेन बेस्ड सिक्युअर हेल्थकेअर ॲप्लिकेशन फॉर कार्डिओडिसीज), प्रा. पंकज फडतर (स्मार्ट मिरर युजींग एआय अँड आयओटी), प्रा. स्नेहा तीर्थ (लो कॉस्ट टच डिसल्पे मेथड बेस्ड ऑन हॉडलींग प्रोजेक्टर युजींग इमेज प्रोसेसींग), डॉ. गीतिका नारंग (ब्लॉकचेन बेस्ड इलेक्ट्रानिक व्हॅक्सीनेशन रेकार्ड स्टोरींग सिस्टम) आणि प्रा. स्नेहा तीर्थ, रोशनी पासलकर (मेथड अँड प्रोसेस हेल्थकेअर अँड बायो इन्फोसमेटीक्स) यांनी या १० पेटंटची निर्मिती केली आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव म्हणतात, ‘‘देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवण्यासाठी वाटचाल करणे गरजेचे आहे.’’ संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांचे पेटंटसाठी विशेष मार्गदर्शन होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28276 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..