शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै रोजी घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा इयत्तानिहाय तसेच पेपरनिहाय जाहीर केलेल्या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28277 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..