ड्रिलिंगचे काम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रिलिंगचे काम अंतिम टप्प्यात
ड्रिलिंगचे काम अंतिम टप्प्यात

ड्रिलिंगचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः चांदणी चौकातील पुलावर ड्रिलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर पुलाच्या बाजूने रॅपिंगच्या (जाळी लावणे) कामास सुरवात झाली. २७ सप्टेंबरपर्यंत रॅपिंगचे काम चालणार आहे. त्यानंतर ड्रिलिंग करून घेतलेल्या खड्ड्यात विस्फोटक भरण्याच्या कामास सुरवात होईल. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांत विस्फोटक लावण्याचे काम पूर्ण केले जाईल. पूल पाडण्याची तारीख अद्याप ठरली नाही. मात्र मंगळवारच्या बैठकीत पूल पाडण्याची तारीख निश्चित होणार आहे. २ ऑक्टोबरला सुट्टी असल्याने त्या दिवशी वाहतूक कमी असेल असा विचार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २ ऑक्टोबरला पूल पाडण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान पूल पाडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागणार असल्याने पोलिस आयुक्तांकडे परवानगी देखील मागण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पूल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी ड्रिलिंगचे काम पूर्ण झाले. गुरुवारी रात्रीपासून पुलाचा स्फोट झाल्यावर दगड इतरत्र पडू नये म्हणून पुलाच्या बाजूने जाळी बसविली जात आहे. त्यामुळे स्फोट झाल्यावर दगड व माती अन्यत्र न पडता खाली रस्त्यांवर पडेल. परिणामी ते उचलणे सोपे जाईल.

मंगळवारच्या बैठकीत तारखेचा निर्णय
मंगळवार २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या बैठकीत पूल पाडण्याची तारीख ठरविली जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, वाहतूक पोलिस व महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. २ ऑक्टोबरला सुट्टी असल्याने वाहतूक कमी राहील असा अंदाज बांधून महामार्ग प्राधिकरणाने २ तारखेचा आग्रह धरला आहे. मात्र त्यास अद्याप वाहतूक पोलिसांकडून मंजुरी मिळाली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28288 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..