"आविष्कर स्पर्धा -2022" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"आविष्कर स्पर्धा -2022"
"आविष्कर स्पर्धा -2022"

"आविष्कर स्पर्धा -2022"

sakal_logo
By

"आविष्कर स्पर्धा -2022"
सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अविष्कार स्पर्धा 2022 कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. राजेश पाटील (संशोधक व प्राचार्य, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या संशोधन पर भाषणामध्ये संशोधनासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांचा एकत्रित सहभागाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तथा अशा विविध स्पर्धेतून संशोधनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दलच्या सूचना देखील केल्या. तद्नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मगन घाटुळे यांनी वरील सूचनांचे पालन करून संशोधनाचे उत्तम कार्य अध्यापक व विद्यार्थ्यांद्वारे करून घेण्याची ग्वाही दिली. याच संदर्भात महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर दीपा रमाणे यांनी संस्थेतील विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थित श्रोत्यांना दिली.
या स्पर्धेदरम्यान डॉक्टर राजेश पाटील यांनी पोस्टरद्वारे प्रदर्शित केलेल्या विविध प्रकल्पांचे निरीक्षण केले व त्यांचा अभिप्राय सांगितला.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशंसनीय पोस्टर सादरीकरणासाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.स्पर्धेच्या समारोप सत्रात डॉक्टर रेणुका वाळूज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग होता आणि म्हणूनच
कार्यक्रमाची सांगता आनंदाने झाली.
एस टी एस चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम एन नवले सर, संस्थापक सेक्रेटरी डॉक्टर सुनंदा नवले
मॅडम, उपाध्यक्ष श्री रोहित नवले सर व श्रीमती रचना नवले अष्टेकर मॅडम यांनी दिलेल्या प्रेरणा आणि पाठिंबामुळे महाविद्यालय अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करत असते.
सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने "आविष्कर स्पर्धा -2022" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. राजेश पाटील, [प्राचार्य, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी] ण्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपप्राचार्या डॉ. दीपा रामाणे यांनी स्वागतपर भाषण मध्ये अभ्यासक्रमातील संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्याच संदर्भात प्राचार्य डॉ. मगन पी. घाटुळे यांनी उपस्थितांना संबोधित करून महाविद्यालयात चालवले जाणारे संशोधन उपक्रम आणि त्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीविषयी माहिती दिली. त्यानंतर पोस्टरद्वारे प्रदर्शित केलेल्या २४ प्रकल्पांचे सर्वेक्षण प्रमुख पाहुणे डॉ. राजेश पाटील यांनी केले आणि प्रदर्शित केलेल्या पोस्टर्सवर त्यांचा अभिप्राय व अनुभव सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट सहभागींना त्यांच्या प्रशंसनीय पोस्टर सादरीकरणासाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समारोपाच्या सत्रात डॉ. रेणुका वाळंज यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटीईएसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, सेक्रेटरी डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष श्री. रोहित नवले व रचना नवले-अष्टेकर यांनी दिलेल्या प्रेरणा आणि पाठिंब्यामुळे महाविद्यालय अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करत असते

फोटो- ९३३७६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28333 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..