Corona BA.2.75 : कोरोना ‘बीए.२.७५’च्या रुग्णसंख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona BA.2.75
कोरोना ‘बीए.२.७५’च्या रुग्णसंख्येत वाढ

Corona BA.2.75 : कोरोना ‘बीए.२.७५’च्या रुग्णसंख्येत वाढ

पुणे : कोरोनाच्या ‘बीए.५’ व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण राज्यात अत्यल्प दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘बीए.२.७५’च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी देण्यात आली.

राज्यात इन्साकॉगअंतर्गत सात प्रयोगशाळांमार्फत कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण नियमित सुरु आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार राज्यात ‘बीए.२.७५’चे ४८६ रुग्ण आढळून आले आहेत. जनुकीय क्रमनिर्धारणाच्या ताज्या अहवालानुसार ‘बीए.२.७५’ या उपप्रकाराचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. त्या तुलनेत ‘बीए.५’ आता अत्यल्प प्रमाणात दिसत आहे. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट केले आहे.
राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची एकूण संख्या ३६९ तर ‘बीए.२.७५’ रुग्णांची संख्या एक हजार १६१ झाली आहे.

‘बीए. ४’ आणि ‘बीए.५’चे रूग्ण
शहर - रुग्णसंख्या
पुणे - २४९
मुंबई - ७२
ठाणे - १६
नागपूर - १०
रायगड - ७
सांगली - ६
पालघर - ४
कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सातारा - प्रत्येकी १

जिल्हानिहाय ‘बीए.२.७५’ :
पुणे - ५१२
मुंबई - ३९३
नागपूर - १५४
यवतमाळ - २६
चंद्रपूर - २०
सोलापूर - १५
गोंदिया - ६
गडचिरोली - २३
भंडारा - ३
अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम- प्रत्येकी २,
सांगली - १

सक्रिय रुग्ण संख्या कमी

राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार ७७९ पर्यंत कमी झाली. गेल्या आठवड्यात ती चार ते साडेचार हजार दरम्यान रुग्णांची नोंद सातत्याने झाली होती.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यात तीन हजार ७७९ रुग्णांपैकी पुणे जिल्ह्यात एक हजार १६३ रुग्ण आहेत. त्या खालोखाल मुंबईमध्ये (७५२) आणि ठाणे (४९३) रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

राज्यातील आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - ७९,६६,०८२ (९८.१३ टक्के)
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या - ८१,१८,१८५
मृत्यू झालेले रुग्ण - १,४८,३२४
राज्यातील मृत्यू दर - १.८२ टक्के

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28360 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..