निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

गोरख गायकवाड यांचे निधन
पुणे : सिंहगड रस्ता येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते गोरख रामचंद्र गायकवाड (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. वीटभट्टी कामगारांचे प्रश्न, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्नांवरील आंदोलने यात त्यांचे योगदान होते.
फोटो : ९३३९३

द्रौपदाबाई मोहोळ यांचे निधन
पुणे : कर्वेनगर येथील द्रौपदाबाई लक्ष्मण मोहोळ (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कर्वेनगर येथील जानाई बुवासाहेब मारुती मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय मोहोळ यांच्या त्या मातोश्री होत.

निर्मला किराणे यांचे निधन
पुणे : जुन्या पिढीतील लेखिका, निर्मला गोपाळ किराणे (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून ‘निबंध व लेखन’ या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला होता. स्नेहवर्धन प्रकाशनाने त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. ‘निर्मल गोपाळ’ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रकाशित झाले होते.
Associated MediIds : PNE22S93393, PNE22S93401, PNE22S93407

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28362 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..