‘सर्वास’ आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे परिषदेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सर्वास’ आंतरराष्ट्रीय
संस्थेतर्फे परिषदेचे आयोजन
‘सर्वास’ आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे परिषदेचे आयोजन

‘सर्वास’ आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे परिषदेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः पाचगणी येथे ‘सर्वास इंटरनॅशनल’ची आंतरराष्ट्रीय परिषद आणि सर्वसाधारण सभा आयोजित केली. यासाठी ५४ देशांतील १४५ प्रतिनिधी येणार आहेत. या निमित्ताने परदेशी पाहुण्यांना आपल्या घरी निवासाची व्यवस्था करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. आता पर्यंत ५० हून अधिक नागरिकांनी परदेशी पाहुण्यांसाठी आपल्या घराची कवाडे उघडी केली आहे. ज्या पुणेकरांना परदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करावयाचे आहे, त्यांनी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन ‘सर्वांस इंडिया’चे राष्ट्रीय सरचिटणीस अभय शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ‘सर्वास’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे विविध देशातून आलेल्या पाहुण्यांना आपल्या परंपरेचा परिचय करून देण्याची आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. २२ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान पाचगणी येथे ‘सर्वास इंटरनॅशनल’ची आंतरराष्ट्रीय परिषद आणि सर्वसाधारण सभा आयोजित केली असून यानिमित्त येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे आपल्या घरी आदरातिथ्य करता येणार आहे. यावेळी डॉ. सतीश देसाई, अशोक पाध्ये, राजेश म्हारोळकर आणि आनंद राजेशिर्के उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28369 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..