आरोग्य खात्याचा चेहरा-मोहरा बदलणार : प्रा. डॉ. सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य खात्याचा चेहरा-मोहरा बदलणार : प्रा. डॉ. सावंत
आरोग्य खात्याचा चेहरा-मोहरा बदलणार : प्रा. डॉ. सावंत

आरोग्य खात्याचा चेहरा-मोहरा बदलणार : प्रा. डॉ. सावंत

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ‘‘अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार सेवा या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा-मोहरा येत्या काळात बदलला जाईल,’’ असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसिन विभाग व इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनची महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने ‘इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन’च्या ६६व्या वार्षिक परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या उद्‌घाटनावेळी डॉ. सावंत बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, ‘एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस’चे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, सार्वजनिक आरोग्य खात्याचे संचालक डॉ. नितीन आंबेकर, डॉ. जयश्री गोठणकर, डॉ. प्रकाश डोके, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. प्रसाद पोरे उपस्थित होते. या वेळी चंदीगड येथील डॉ. आर. डी. बन्सल यांना ‘एच. सी. तिवारी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.
डॉ. सावंत म्हणाले, ‘‘नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आहे. नवरात्रीपासून ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्यातून महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य खाते घरोघरी जाऊन कार्य करणार आहे. महिलांच्या विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.’’ डॉ. कदम म्हणाले, ‘‘कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेसाठी गुंतवणूक करणे किती गरजेचे आहे हे कळाले. त्यावेळी सरकारने निर्णय घेऊन यासाठी मोठे काम केले. तंत्रज्ञान सतत बदलत आहे त्यामुळे या परिषदेसाठी निवडलेला आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान हा विषय अतिशय समर्पक आणि गरजेचा आहे.’’ तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी देशभरातून सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील ९८० डॉक्टर्स उपस्थित आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28412 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..