उत्तीर्णांची टक्केवारी वाढली विद्यापीठ ः पदवीच्या निकालांचा कल, पुनर्परीक्षा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तीर्णांची टक्केवारी वाढली

विद्यापीठ ः पदवीच्या निकालांचा कल, पुनर्परीक्षा नाही
उत्तीर्णांची टक्केवारी वाढली विद्यापीठ ः पदवीच्या निकालांचा कल, पुनर्परीक्षा नाही

उत्तीर्णांची टक्केवारी वाढली विद्यापीठ ः पदवीच्या निकालांचा कल, पुनर्परीक्षा नाही

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः संयुक्त उत्तीर्णता, मागील सत्रातील पुनर्परीक्षा आणि दोन पेपरमधील गॅपमुळे यंदा पदवीच्या अनेक अभ्यासक्रमांतील उत्तीर्णांची टक्केवारी ४० ते ५० टक्क्यांनी वाढली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लांबलेल्या परीक्षांचा निकाल आता वेगाने घोषित होत असून, यंदा उत्तीर्णांचे प्रमाण वाढल्याने उन्हाळी सत्राची पुनर्परीक्षा होणार नाही. तर डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुढील सत्राच्या परीक्षेतच विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल, अशी घोषणा विद्यापीठाने केली आहे.

राज्यभरातील बहुतेक सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षेचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन हीत पाहता ऑफलाईन परीक्षेचा मार्ग स्वीकारला होता. कोरोनापूर्व स्थितीतील सर्व नियमांचे पालन करत विद्यापीठाने पारदर्शक परीक्षा घेतल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने म्हटले आहे. संचालक डॉ. महेश काकडे म्हणतात, ‘‘कोरोनातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन मागील सत्रात तीन वेळा पुनर्परीक्षा घेतली होती. तर उन्हाळी सत्राची परीक्षा लेखी पद्धतीने अवलंबिण्यात आली. लेखी परीक्षेला विद्यार्थ्यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे.’’ निकालाबाबत उपस्थित सर्व विद्यार्थी संघटनांनी चर्चा केल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. ते म्हणतात, ‘‘विद्यार्थ्यांना निकालाबाबत काही शंका असल्यास प्रचलित पद्धतीने फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये आढळणाऱ्या त्रुटीमध्ये तथ्य असल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा परतावाही उपलब्ध आहे.’’


वाढलेले निकाल ः
- अभियांत्रिकीतील उत्तीर्णाचे वाढलेले प्रमाण ः ४० टक्के
- विधी शाखेतील उत्तीर्णांचे वाढलेले प्रमाण ः ४८ टक्के
- एकूण अभ्यासक्रम ः २३४
- शुक्रवारी सकाळपर्यंत घोषित झालेले निकाल ः ११७
- विद्यापीठांतर्गत कॅपची केंद्रे ः १४६ (पूर्वी ४२)


कोट
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल घोषित होतील. मुलांचे हीत लक्षात घेऊन आपण लेखी पद्धतीने परीक्षा घेतली. समाधानाची बाब म्हणजे कोविडपूर्व निकालांच्या तुलनेत यंदाच्या निकालांत उत्तीर्णांची टक्केवारी वाढली आहे.
- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28425 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..