‘कालिका देवीच्या मंदिरात होणार आदिशक्तीचा जागर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कालिका देवीच्या मंदिरात 
होणार आदिशक्तीचा जागर’
‘कालिका देवीच्या मंदिरात होणार आदिशक्तीचा जागर’

‘कालिका देवीच्या मंदिरात होणार आदिशक्तीचा जागर’

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः बुधवार पेठ येथील सो. क्ष. कासार श्री कालिका देवी संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र व कालिका सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अकरा दिवसांच्या महोत्सवात संगीत संध्या, दांडिया, पुरस्कार, दांडिया यासह अन्य धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार असल्याची माहिती कालिका देवी संस्थानचे डॉ. सुनील अंधुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी श्री सूक्त पठण व भजन तसेच श्री ची मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता दांडिया चा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी रात्री आठ वाजता भोंडला होणार आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता व्याख्यान व महिलासाठी स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता संगीत संध्येचे आयोजन केले असून श्रीधर फडके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत वैद्यकीय तपासणी शिबिर होणार आहे. रविवारी धार्मिक कार्यक्रम होतील. सोमवार ३ ऑक्टोबरला नवचंडी याग व महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवारी कालिका महिला रत्न पुरस्काराचे रात्री आठ वाजता वितरण होणार आहे. विविध कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होणार आहे. या पत्रकार परिषदेत धनंजय पाचपुते, रमाकांत कानडे, विलास यांदे, लक्ष्मीकांत सासवडे,दीपक पाथरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28441 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..