रस्त्यात पडलेल्या वाहिनीमुळे महिला पोलिस जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यात पडलेल्या वाहिनीमुळे महिला पोलिस जखमी
रस्त्यात पडलेल्या वाहिनीमुळे महिला पोलिस जखमी

रस्त्यात पडलेल्या वाहिनीमुळे महिला पोलिस जखमी

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : रस्त्यात पडलेल्या वाहिनीमुळे दुचाकीस्वार महिला पोलिस कर्मचारी घसरून पडली. ही घटना सोमवारी (ता. १९) खडकी-औंध रस्त्यावर घडली. अपघातात महिला पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी वाहिनी रस्त्यात टाकणाऱ्या विरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सरिता सीताराम डामसे (वय २६, रा. रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. डामसे पिंपरी पोलिस आयुक्तालयातील सांगवी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास डामसे या कामावर निघाल्या होत्या. खडकी-औंध रस्त्यावरील पशुसंवर्धन कार्यालयासमोर रस्त्यात लटकत असलेली वाहिनी त्यांच्या दुचाकीच्या हँडलला गुंडाळली गेली. डामसे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या रस्त्यात पडल्या. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. रस्त्यात निष्काळजीपणे वाहिनी टाकल्याने अपघात झाल्याची फिर्याद डामसे यांचे बंधू गणेश डामसे (वय २२, रा. पिंपळे गुरव) यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28445 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..