
क्राईम
कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला बेड्या
पुणे, ता. २५ ः भरवस्तीत कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका सराईताला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली.
ऋृषीकेश ऊर्फ सोन्या संदीप मंडलिक (वय २६, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार तेजेस पांडे यांनी फिर्याद दिली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांना सराईत मंडलिक हा नेहरू रोडवरील सोनवणे हॉस्पिटल शेजारील बसस्टॉप जवळ थांबल्याची बातमी मिळाली. त्यानुसार मंडलिक याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती केली असता त्याच्याकडे ६० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व पाच हजार किमतीचे पाच जिवंत काडतुसे मिळून आली.
-------------
दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक
पुणे, ता. २५ ः सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिवकुमार जयभीम दोडमणी (वय २५, रा. शिवतीर्थनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दोडमणीने सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरली होती. तो रघुनंदन हॅाल परिसरात थांबल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर दोडमणीला ताब्यात घेण्यात आले. तपासात दोडमणीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोडमणीने सिंहगड रस्ता परिसरातून दोन दुचाकी तसेच मार्केट यार्ड भागातून एक दुचाकी चोरल्याची तपासात उघड झाले आहे.